कोंढव्यामध्ये महावितरण कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; फौजदारी गुन्हा दाखल

पुणे : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे कर्मचारी दशरथ अंबादास मुंडे हे सहकाऱ्यासमवेत गुरुवारी (दि. २५) शाह हाईट्स, भाग्योदयनगर, कोंढवा येथील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते. यावेळी दोन थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करून त्यांनी वीजमीटर ताब्यात घेतले असता आरोपी इरशाद शाह या व्यक्तीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच ताब्यात घेतलेले मीटर त्याने परत घेतले.

त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३५३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरु आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
DHANANJAY MUNDE - AJIT PAWAR

योद्धा म्हटलं की आम्हाला अजितदादा दिसतात – धनंजय मुंडे

Next Post
nilesh rane - mehbub shaikh

“वैचारिक दृष्ट्या ‘दीड फूट’ उंची असणाऱ्या या पोपटाचा जन्मच ‘शिमग्याला’ झालेला आहे वाटतं”

Related Posts
देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

देशभक्तो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान! भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

Pune – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी आज सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर…
Read More
muraji patel

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून भाजप उमेदवार मागे घेणार? फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

मुंबई| महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची (Andheri East Bypoll Election) चर्चा आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही…
Read More
ShahRukh Khan | त्या दिवशी शाहरुखने शिवी दिलीच नव्हती, वानखेडे स्टेडियमवरील वादाबाबत मोठा खुलासा

ShahRukh Khan | त्या दिवशी शाहरुखने शिवी दिलीच नव्हती, वानखेडे स्टेडियमवरील वादाबाबत मोठा खुलासा

ShahRukh Khan | नुकताच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला.…
Read More