Nana Patole | कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणाऱ्या नाना पटोलेंच्या पोस्टरला भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने चिखल मारो आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अकोला येथील कार्यकर्त्याच्या हातून पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना घेरले आहे. त्यांच्या या कृतीविरोधात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांनी सोलापूर शहरामध्ये चिखल फेक आंदोलन केले आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चिखलात पाय भरल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले सामान्य जनतेला गुलाम समजणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने कन्ना चौकात नाना पटोले यांच्या पोस्टरला चिखल मारो आंदोलन करण्यात आले. “मुर्दाबाद” “मुर्दाबाद” धिक्कार असो धिक्कार असो नाना पटोले यांचा अधिकार असो अशा घोषणांनी कन्ना चौक परिसर दुमदुमून गेला.

यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, युवा मोर्चा सरचिटणीस रवि कोटमाळे, सिध्दार्थ मंजेली, माजी साभागृह नेता संजय कोळी, श्रीनिवास करली, वैभव हत्तुरे,राजु पाटील , दत्तु पोसा,अजित गायकवाड गौतम कसबे ,देविदास बनसोडे, शेखर फंड,समर्थ होटकर, श्रीपाद घोडके,माजी महापौर शोभा बनशेट्टी,श्रीकांचना यन्नम वंदना गायकवाड,स्वाती आवळे,विजयालक्ष्मी गड्डम,राधिका पोसा,विमल पुट्टा, राहुल घोडके, विशाल शिंदे, निलेश शिंदे, आनंद बिरू, नागेश सरगम, प्रतिक आडम, अमोल झाडगे,प्रवीण कांबळे, जगन्नाथ चव्हाण, संतोष बंडगर, शेखर ईराबत्ती, श्रीनिवास दायमा, चंद्रकांत तापडिया,विजय बंमगोडे,पवण आलुरे,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like