दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर ‘शक्तिमान’ संतापला, भगव्या बिकिनीबाबत म्हणाले,…

मुंबई – शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा चित्रपट ‘पठाण’ रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे पहिले गाणे रिलीज झाले असून दीपिका पदुकोणचा बोल्ड लूक आणि भगवी बिकिनी यामुळे हे गाणे चांगलेच ट्रोल होत आहे.

या चित्रपटात दीपिका आणि शाहरुख यांच्यात चित्रित केलेल्या बोल्ड सीनवर लोकांनी आक्षेप घेतला होता, तसेच दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरही आक्षेप घेतला होता. खासदार नरोत्तम मिश्रा यांनी तर चित्रपटावर बंदी घालण्याबाबत बोलले आहे. सोबतच वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्येही समोर येऊ लागली आहेत. यातच आता याप्रकरणी आता अभिनेता मुकेश खन्ना यांनीही वक्तव्य केलं आहे.

मुकेश खन्ना यांनी दीपिका आणि शाहरुखच्या या गाण्याला अश्लील म्हटले आहे. मुलंही टीव्ही पाहतात, त्यामुळे अशी गाणी सेन्सॉर बोर्डानं पास करू नयेत, नाहीतर मुलांवर त्याचा वाईट परिणाम होईल, असं या अभिनेत्याचं म्हणणं आहे. मुकेश खन्ना म्हणाले की, सेन्सॉर बोर्ड हे सर्वोच्च न्यायालय नाही ज्याला विरोध करता येणार नाही.असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.