Mukesh Khanna | “अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया

Mukesh Khanna | २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने केलेल्या कामांपैकी सर्वाधिक चर्चा झाली ती अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराची. यामुळे भाजपाला अयोध्येत मोठा विजय मिळेल असे अपेक्षित होते. परंतु घडले याउलट. अयोध्येतील या निकालावर देशभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान अयोध्येत (Ayodhya) भाजपच्या झालेल्या पराभवाबद्दल मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “अयोध्या निवडणुकीतील पराभवातून आपण हे शिकायला हवे की, भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोटींच्या बजेटमध्ये काही कोटी ठेवणे आवश्यक आहे. मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळील खाटू शाम मंदिर असो, यांचे श्रद्धेचे ठिकाण पर्यटन स्थळ होऊ देऊ नका. लोकही तिथे राहतात, त्यांचीही काळजी घेतात.” मुकेश खन्ना यांच्या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप