वयोवृद्ध मुलायम सिंह यादव यांना मुलगा अखिलेश यादव यांच्यासाठी घ्यावी लागली सभा

करहल – समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव बऱ्याच दिवसांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना दिसले. गुरुवारी त्यांनी मैनपुरीतील करहल येथे सपाच्या कार्यकर्ता परिषदेला संबोधित केले. मुलायमसिंह यादव यांनीही येथून पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा प्रचार केला.

मुलायमसिंह यादव म्हणाले की, देशातील तरुण बेरोजगार आहेत. त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. योगी सरकार हे करत नाही. राज्यात सपाचे सरकार आल्यास तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, अशी ग्वाही मी देतो. शेतकरी, तरुण आणि व्यापारी हेच देश मजबूत करतील, असे मुलायमसिंह यादव म्हणाले.

शेतकर्यांच्या खताची व्यवस्था करावी, त्यांची पिके विकण्याची व्यवस्था करावी, असे यादव म्हणाले. शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे. खत, बियाणांची व्यवस्था करावी आणि त्याला सिंचनाची साधने उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळेल. उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल. शेतकरी, तरुण आणि व्यापारीच हा देश मजबूत करतील, असे मुलायमसिंह यादव म्हणाले.