Mumbai Coastal Road | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी खुली

Mumbai Coastal Road | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मुंबई कोस्टल रोड बोगद्याची पाहणी, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी खुली

Mumbai Coastal Road | ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अँटीक कारमधून या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

उत्तर वाहिनी मार्गिका खुला केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान (Mumbai Coastal Road) होणार असून सुमारे पाऊण तासांचे हे अंतर अवघ्या १० मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली चौक) पर्यंत जाणे सुलभ होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला ९ किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे. सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी केली. नरिमन पॉईंट ते हाजीअलीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल.

हा बोगदा अत्यंत अद्ययावत पध्दतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वतः या फोनवरुन नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो त्याची माहिती जाणून घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Previous Post
Suicide News | डिप्रेशनमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल, पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह

Suicide News | डिप्रेशनमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल, पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह

Next Post
Muralidhar Mohol | "आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन पुणेकरांना घडलं", सुप्रिया सुळेंच्या मंत्रीपदाच्या टिकेवर मोहोळ यांचं उत्तर

Muralidhar Mohol | “आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन पुणेकरांना घडलं”, सुप्रिया सुळेंच्या मंत्रीपदाच्या टिकेवर मोहोळ यांचं उत्तर

Related Posts
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

Zareen Khan Arrest Warrant: बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, कोलकात्याच्या सियालदह न्यायालयाने जरीन खानच्या…
Read More
Mohit Kamboj

शपथ महादेवाची … 30 दिवसात उत्तर देवू; मोहित कंबोज यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २९ जूनच्या रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Resigned) दिला. एकनाथ शिंदे (Eknath…
Read More
मुकेश अंबानींनी खरेदी केले 1000 कोटींचे विमान, देशात कोणाकडेही नाही हे महागडे विमान

मुकेश अंबानींनी खरेदी केले 1000 कोटींचे विमान, देशात कोणाकडेही नाही हे महागडे विमान

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता अशा विमानाचा त्यांच्या…
Read More