सीमाशुल्क विभागाच्या (Mumbai Customs Department) अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9 व 10 एप्रिल 2025 रोजी 785 ग्रॅम वजनाचे व सुमारे 7.85 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले असून यासंदर्भात एका परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
9 एप्रिल 2025 रोजी यूआर430 या विमानाने प्रवास करुन मुंबईत (Mumbai Customs Department)आलेल्या एका परदेशी प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरुन रोखले होते. चौकशी करताना हा प्रवासी अस्वस्थ व चिंतीत झाल्याचे जाणवले. पुढील चौकशीत व वैद्यकीय तपासणीत प्रवाशाने पिवळ्या रंगाच्या भरपूर गोळ्या गिळल्याचे आढळून आले. या गोळ्यांमध्ये कोकेन असल्याचा संशय असलेला पांढऱ्या रंगाचा चुरगाळलेला पदार्थ होता.
वैद्यकीय देखरेखीअंतर्गत 13 एप्रिल 2025 रोजी केलेल्या पंचनाम्यात हा पदार्थ 785 ग्रॅम वजनाचे कोकेन असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आढळले. त्याची अंदाजे किंमत 7,85,00,000 रुपये इतकी आहे. या प्रवाशाला एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया
पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर
पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar