मुंबई : मुंबई इंडियन्ससह आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या हार्दिक पंड्याला इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान दिलेले नाही. मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना कायम ठेवले आहे.
हार्दिक पांड्या पुढील आयपीएल हंगामात नवीन संघात सामील होऊ शकतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. पांड्या अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. हार्दिकला टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्समध्ये अष्टपैलू म्हणून जबाबदारी मिळाली, पण पांड्या बराच काळ गोलंदाजीपासून दूर राहिला. दुखापतीनंतरच्या शस्त्रक्रियेमुळे हार्दिकला गोलंदाजीत अनेक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे त्याच्या फलंदाजीवरही मोठा परिणाम होत आहे.
२०२१ च्या मोसमातही हार्दिकची कामगिरी खूपच खराब झाली आहे. हार्दिक पांड्याने 2021 च्या मोसमात 12 सामन्यात केवळ 127 धावा केल्या आणि गोलंदाजीपासून दूर राहिला. हार्दिकसोबतच त्याचा भाऊ क्रुणालही मुंबई इंडियन्सच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही.
मुंबई इंडियन्स मध्ये हार्दिक दिसणार नसल्याने पांड्याने सोशल मिडीयावर भावनिक पोस्ट केली आहे. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले की, ‘मी या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन. हे क्षण मी माझ्याजवळ ठेवीन. मी जी मैत्री केली आहे, जे बंध निर्माण केले आहेत, माझे जे लोक आणि चाहते आहेत, त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.’
तो पुढे म्हणाला की, ‘मी इथे फक्त एक खेळाडू म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून मोठा झालो आहे. मी तरुणपणी मोठी स्वप्ने घेऊन आलो. आम्ही एकत्र जिंकलो, एकत्र हरलो, एकत्र लढलो. मुंबई इंडियन्ससोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. संघासाठी माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान असेल.’
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM&t=73s