राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिस ऍक्शन मोडमध्ये, अनधिकृत मजारबाबत मोठी अपडेट

Mumbai- गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा (Padwa Melava Live) आयोजण्यात आला. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या शब्दांनी टीकाकारांना गपगार केले. तसेच यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी मुंबईतल्या माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर अनधिकृतपणे मजार बांधली गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी दाखवला, तसंच या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, तर त्या मजारीसमोरच गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. माहिम दर्गाच्या परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी भाषणात केला, त्यानंतर आता पोलीस या जागेची पाहणी करून पडताळणी करणार आहेत. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पडताळणी करणार आहेत. दरम्यान या भागातले आमदार सदा सरवणकर हेदेखील गुरूवारी तिकडे जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती आहे.

ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रांतात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस दोघांकडून जागा पडताळली जाणार आहे. जर तथ्य असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.