Muralidhar Mohol | भाजपने नेहमीच विकासाला आणि पुणेकरांच्या हिताला प्राधान्य दिले आहे

Muralidhar Mohol | भाजपने नेहमीच विकासाला आणि पुणेकरांच्या हिताला प्राधान्य दिले आहे

Muralidhar Mohol | पुणे शहराच्या 1987 च्या विकास आराखड्यात एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. राज्यातील महायुती आघाडी सरकारने आज या प्रकल्पाला मान्यता दिली. त्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणेकरांच्या वतीने मनापासून आभार मानले आहेत.

मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) पुढे म्हणाले, भाजपने नेहमीच विकासाला आणि पुणेकरांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. एचसीएमटीआर रस्ता पुणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. युती सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता मिळावी यासाठी अनेक बैठका सुध्दा घेतल्या, प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच या प्रकल्पाच्या प्रस्तावाला आज राज्य सरकारने मान्यता दिली. त्यावर पुणेकरांच्या सुचना आणि हरकती मागविण्यात आल्या असून त्याचा विचार करूनच प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे शहराचा महापौर असताना हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केले. रस्त्याचे नियोजन आणि आखणी व्यवस्थित पध्दतीने व्हावी यासाठी काही बदल सुचविण्यात आले आहेत. यामुळे रस्ता करत असताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. राज्य शासनाने या बदलांना मान्यता दिली असून, आता रस्त्याच्या आखणी मधील सर्व अडथळे दूर झाले आहेत. लवकरच या रस्त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील उपनगरांना जोडणारा एचसीएमटीआर रस्ता आवश्यक आहे. तो वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा मी करीन अशी ग्वाही यावेळी मोहोळ यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sunil Tatkare | Won't Leave my Karyakartas in the Lurch in the Constituency Where There's No Mahayuti Candidate 

Sunil Tatkare | Won’t Leave my Karyakartas in the Lurch in the Constituency Where There’s No Mahayuti Candidate 

Next Post
Manipal Hospital | डी वेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करुन मणिपाल हॉस्पिटल बाणेरच्या डॉक्टरांनी वाचवला ३८ वर्षीय महिलेचा जीव

Manipal Hospital | डी वेव्ह तंत्रज्ञानाचा वापर करुन मणिपाल हॉस्पिटल बाणेरच्या डॉक्टरांनी वाचवला ३८ वर्षीय महिलेचा जीव

Related Posts
अजित पवार

विदर्भात जेवढा पक्ष वाढायला हवा तेवढा पक्ष वाढलेला नाही, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या…
Read More
मध्यरात्री मला फोन आला अन्..., पहिल्या वनडे सामन्यात मॅच विनिंग खेळी करणाऱ्या अय्यरचा खुलासा

मध्यरात्री मला फोन आला अन्…, पहिल्या वनडे सामन्यात मॅच विनिंग खेळी करणाऱ्या अय्यरचा खुलासा

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंडविरुद्ध नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळणार नव्हता. आदल्या रात्री चित्रपट पाहिल्यानंतर तो झोपण्याच्या तयारीत होता…
Read More

उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशला जाण्यासाठी टीचर्स स्पेशल ट्रेन एलटीटी कुर्ला येथून सुटणार

मुंबई – कोविड काळ सुरु झाल्यापासून रेल्वेने सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व स्पेशल ट्रेन रद्द केल्या आहेत. याही वर्षी जवळजवळ…
Read More