Muralidhar Mohol | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला

Muralidhar Mohol | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला

Muralidhar Mohol | पुणे शहरात काल घडलेल्या अत्यंत दुःखद अपघातामुळे दोन संगणक अभियंता प्राणास मुकले. त्या संदर्भात आज भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.

यावेळी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) , हर्षदा फरांदे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, प्रदीप देशमुख, लतीफ शेख, रूपाली पाटील, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, राहुल भंडारे व इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून गेल्या काही काळापासून अनिर्बंध पद्धतीने वाढत असलेली पब संस्कृती पुण्याच्या या प्रतिष्ठेला धक्का देत आहे. तसेच त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसन आणि त्यामुळे होणारे अपघात याला आळा घालायचा असेल तर पुण्यातील पब वर अत्यंत कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना सांगितले.

यावेळी कालच्या अपघाता संदर्भात पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यामधील वाढत्या पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी आवश्यकता सर्व कठोर उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन पोलीस आयुक्त यांनी उपस्थित शिष्टमंडळाला केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Chris Gayle | ख्रिस गेल आरसीबीकडून आयपीएल २०२५ चा हंगाम खेळणार? विराट कोहलीने केली मागणी

Chris Gayle | ख्रिस गेल आरसीबीकडून आयपीएल २०२५ चा हंगाम खेळणार? विराट कोहलीने केली मागणी

Next Post
Buddha Purnima | पुणे, नांदेड, बीड, औरंगाबादसह त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना बुद्धरूपांचे वितरण  

Buddha Purnima | पुणे, नांदेड, बीड, औरंगाबादसह त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना बुद्धरूपांचे वितरण  

Related Posts
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर घडला विचित्र प्रकार, फेरारीला बैलगाडीने नेले ओढत - Video

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर घडला विचित्र प्रकार, फेरारीला बैलगाडीने नेले ओढत – Video

महाराष्ट्रातील रायगडमध्ये मंगळवारी (31 डिसेंबर) रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर ( Mumbai Beach) एक आलिशान फेरारी कार वाळूत अडकल्याचे विचित्र दृश्य…
Read More
gulabrao

चुना कसा लावतात हे अजून राऊतांना माहित नाही, वेळ येईल तेव्हा चुना लावेन – गुलाबराव पाटील

गुवाहाटी – महाराष्ट्रात सुरू असलेली राजकीय कोंडी आणखी वाढली आहे. एकीकडे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीहून गोव्यात येण्याचा…
Read More
हिवाळ्यात बाळाच्या खोलीत रात्रभर हीटर चालवणे कितपत योग्य आहे? तज्ञाकडून जाणून घ्या

हिवाळ्यात बाळाच्या खोलीत रात्रभर हीटर चालवणे कितपत योग्य आहे? तज्ञाकडून जाणून घ्या

Baby Care Tips:- हिवाळ्याच्या मोसमात जेव्हा पारा घसरतो तेव्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी आपले घर उबदार ठेवणे हे आपले…
Read More