Muralidhar Mohol | “आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन पुणेकरांना घडलं”, सुप्रिया सुळेंच्या मंत्रीपदाच्या टिकेवर मोहोळ यांचं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेतली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. परंतु बारामतीच्या नवनिर्वाचीत खासदार सुप्रिया सुळे यांना ही बाब पचलेली दिसत नाही. पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा पुणेकरांना व्हावा, ठेकेदारांना होऊ नये, असा खोचक टोला खासदार सुळे यांनी नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नाव न घेता लगावला. आता यावर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या एक्स अकाउंटवरुन प्रतिक्रिया देताना मोहोळ (Muralidhar Mohol) यानी लिहिले, सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.

ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो, असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले, उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही, असेही मोहोळ म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!