‘अहो मुरलीधर मोहोळ,… कर वाढवणारे तुम्ही व आता सूट देण्याचा ढोल पिटणारे देखील तुम्हीच’

Pune –  पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधान भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार माधुरी मिसाळ,आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

दरम्यान, पुणे महापालिकेकडून मिळकत करात 40 टक्के, तर देखभाल- दुरुस्तीमध्ये 15 टक्क्यांची सवलत दिली जात होती. मात्र, 2018 मध्ये देखभाल-दुरुस्तीतील पाच टक्क्यांची आणि मिळकत करात 40 टक्के सवलत राज्य सरकारने रद्द केली. त्यामुळे पुणेकरांच्या मिळकत करात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मिळकत करातील 40 टक्क्यांची सवलत कायम ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. या संदर्भात पुण्याच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं.

दरम्यान, भाजपच्या शिष्ठमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra fadanvis) भेट घेऊन न मिळकत करात देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम ठेवण्याची मागणी केली होती. आता या निर्णयामुळे पुणेकरांची अतिरिक्त करातून सुटका होणार आहे.मात्र  या निर्णयानंतर क्रेडीट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवर आम आदमी पक्षाचे अभिजित मोरे यांनी टीका केली आहे.