पिंपरी चिंचवड हादरले; प्रेमभंगातून अपहरण करून प्रेयसीच्या भावाचा खून

पिंपरी -चिंचवड : प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या भावाचेच अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, २० कोटींची खंडणी मागून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला असे पोलिसांनी सांगितले.

आदित्य आगले (Aditya Agale)  (वय सात वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदूर (Manthan Kiran Bhosale and Aniket Samdoor) यांना अटक करण्यात आली आहे. आदित्यचा मृतदेह रात्री भोसरी MIDC परिसरात आढळून आला आहे. या घटनेन पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मंथन किरण भोसले हा मयत आदित्यच्या सोसायटीत राहत आहे. मयत आदित्यच्या बहिणीवर मंथनच एकतर्फी प्रेम होत असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या प्रेमाला घरातूनच विरोध होता. यावरून भांडण देखील झाले होते.

हा राग मनात ठेवून त्याने गुरुवारी संध्याकाळी आदित्य सोसायटीच्या खाली खेळण्यास आला ,तेव्हा मित्राला त्याला गाडी जवळ बोलावण्यास सांगितले. आदित्यला गाडी जवळ येताच आत घेऊन त्याच नाक आणि तोंड दाबून जागीच ठार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान,‘मी खेळायला जातो’, असं सांगून आदित्य गुरुवारी घराबाहेर पडला होता. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आदित्य बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. मुलगा कुठे आढळून न आल्यानं अखेर आदित्यच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानक गाठलं. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी आदित्यचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री आदित्यचा मृतदेह आढळून आला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. भोसरीतील एमआयडीसीमध्ये एका इमारतीच्या टेरेसवर सात वर्षीय आदित्यचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली.विशेष म्हणजे या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी आदित्यच्या कुटुंबियांच्या व्हाट्सएपवर २० कोटींची खंडणी मागण्यात आली. परंतु, अवघ्या काही तासातच आरोपीपर्यंत पोहचत गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.