Murlidhar Mohol | रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; मुरलीधर मोहोळ आणि अश्विनी वैष्णव यांच्यात सविस्तर चर्चा

Murlidhar Mohol | रेल्वेच्या पुणे विभागाचे विषय लवकरच मार्गी लागणार; मुरलीधर मोहोळ आणि अश्विनी वैष्णव यांच्यात सविस्तर चर्चा

Murlidhar Mohol | रेल्वेच्या पुणे आणि विभागातील विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावतानाच पुण्यातून वंदे भारत ट्रेन सुरु कराव्यात, यावर सकारात्मक चर्चा झाली. विशेष म्हणजे वैष्णव यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात प्रत्यक्ष नकाशावर सविस्तर माहिती दिली.

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेचे अनेक विषय गेली काही वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुढाकार घेतला आहे. प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याने हे विषय लवकरच मार्गी लागणार आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व विषयांवर वैष्णव यांनी सविस्तर माहिती तर दिलीच, शिवाय आगामी काळातील कृती आराखड्याबाबतही चर्चा केली’

विशेष म्हणजे गुरुवारी लोकसभेतील भाषणात रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्वाच्या महानगरांना जोडणारी वंदे भारत मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा, या संदर्भातही चर्चा केली’, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Eknath Shinde | कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

CM Annapurna Yojana | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत असणार

Jitendra Awhad car attack | जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांबूने फोडली गाडी

Previous Post
Assembly Elections 2024 | भाजपचा आमदार करतोय शरद पवारांच्या नेत्याला विधानसभेसाठी प्रमोट ?

Assembly Elections 2024 | भाजपचा आमदार करतोय शरद पवारांच्या नेत्याला विधानसभेसाठी प्रमोट ?

Next Post
Paris Olympics 2024 | ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला 46 सेकंदात केलं 'आऊट'

Paris Olympics 2024 | ऑलिम्पिकमध्ये नवा वाद! पुरूषाची स्त्री झाली, प्रतिस्पर्धी तरुणीला 46 सेकंदात केलं ‘आऊट’

Related Posts
Vijay Vadettiwar | 99 हजार कोटी राजकोषीय तूट म्हणजे दिवाळखोरीकडे वाटचाल, वडेट्टीवार यांचे अंतरिम अर्थसंकल्पावर टीकास्त्र

Vijay Vadettiwar | 99 हजार कोटी राजकोषीय तूट म्हणजे दिवाळखोरीकडे वाटचाल, वडेट्टीवार यांचे अंतरिम अर्थसंकल्पावर टीकास्त्र

Vijay Vadettiwar – राज्यातील शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्गीयांची फसवणूक करणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज राज्य सरकारने सादर केला आहे. विकासाचे…
Read More
भारतीय सेना दल आणि पुनीत बालन संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

भारतीय सेना दल आणि पुनीत बालन संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन

पुणे ( Punit Balan Group) | राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध…
Read More
aaditya thackeray

गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंची डरकाळी

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात…
Read More