गणपतीची पूजा करणाऱ्या मुस्लीम परिवाराच्या विरोधात निघाला फतवा

अलीगड – अलीगडचे एक मुस्लिम कुटुंब (Muslim Family) चर्चेत आहे. जातीय सलोखा राखत कुटुंबीय गणपतीला प्रार्थना करत आहेत. पण धर्माच्या ठेकेदारांना त्यांची पूजा आवडले नसून या कुटुंबाला पाखंडी म्हटले जात आहे. त्या कुटुंबाविरोधात फतवा (fatwa) काढण्यात आला आहे. मात्र, यूपीचे अल्पसंख्याक मंत्री दानिश अन्सारी (Danish Ansari) यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुटुंबाला संपूर्ण सुरक्षा दिली जाईल आणि त्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

देवबंदच्या मुफ्तींनी अलीगढमध्ये एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी गणपतीची स्थापना आणि पूजा केल्याबद्दल फतवा काढला आहे. ते गैर-इस्लामी असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले आहे. त्यामुळे रुबी खानच्या गणेश आरतीवर फतवा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशा फतव्यांमुळे देशाचे नुकसान होत असल्याचे सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे. समाजात परस्पर वैमनस्य वाढत आहे. एखाद्या कुटुंबाने स्वत:च्या इच्छेने पूजा पाठ केली तर कुणाला कशाला त्रास व्हावा.असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.