मुस्लिमांनी एकत्र येऊन मशिदींवरील कारवाईला विरोध केला पाहिजे; पीएफआयचे आवाहन

नवी दिल्ली – देशात सध्या सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेने उडी घेतली आहे. PFI ने एक प्रेस रिलीज जारी करून देशभरातील मुस्लिमांना मशिदींवर केल्या जाणाऱ्या दाव्यांना विरोध करण्याचे आवाहन केले आहे.

केरळमधील पुतथानी येथे या कट्टरपंथी संघटनेने 23 आणि 24 मे रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती, ज्यामध्ये देशातील मुस्लिमांना मशिदींविरोधात सुरू असलेल्या कारवाईला विरोध करण्याचे आवाहन करणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दुसरीकडे मथुरेच्या ज्ञानवापी मशीद आणि शाही इदगाह मशिदीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने स्वीकारल्याबद्दल पीएफआयने निराशा व्यक्त करणारे पत्र जारी केले आहे.

पीएफआयने म्हटले आहे की, या याचिका प्रार्थनास्थळ कायदा, 1991 च्या विरोधात आहेत आणि न्यायालयाने त्या स्वीकारल्या नसाव्यात. तथ्ये आणि पुराव्याच्या आधारे अशा दाव्यांची तपासणी करण्याची गरज न्यायालयांना वाटली नाही, ज्याचा परिणाम असा होतो की देशात कुठेही कोणत्याही प्रार्थनास्थळावर कोणीही दावा करू शकतो, परिणामी अनेक जातीयवादी घटक मशिदींना लक्ष्य करत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील मंगळुरू येथील जामा मशिदीवरही आता दावा करण्यात आला आहे.