आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, अडीच हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई- महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आज महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने होत असलेल्या अपमानाविरुद्ध हा मोर्चा काढण्यात येत असून या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही उपस्थिती लावणार आहेत. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

तत्पूर्वी महानगरपालिकेने कर्मचारी मोर्चाची तयारी करत असून मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून पोस्टरबाजीही करण्यात आली आहे. महामोर्चा हल्लाबोल या ब्रिदवाक्याखाली या मोर्चासाठी सगळे महाविकास आघाडीतील नेते जमा होणार आहोत. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.