गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत होते. परंतु फडणवीस यांनी या प्रकरणी मौन बाळगले होते. मात्र नागपूरमध्ये बोलताना त्यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. “अनिल देशमुखयांच्यावर त्यांनी बनविलेला सीपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात कोर्टाने जेलमध्ये पाठवलं, पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात. माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो. यांच्यावर बोलणं मी माझा कमी पण समजतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील लोकांना माहित असावं म्हणून मी बोलाव लागतं”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जाता आलं पण बाहेर येता आलं नव्हतं मी तसा नाही; मी चक्रव्यूव्ह भेदून बाहेर येणार आहे. त्यांना माहीत आहे एकावर अटॅक केला की, यांना कमी करता येऊ शकतं, घेरता येऊ शकत म्हणून यांची लोक सकाळी उठले की भोंगे वाजवतात. माझी ताकत माझी जनता आहे. फडणवीसची ताकत ही जनता आहे माझे कवच कुंडल आहे, असेही त्यांनी म्हटले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप