Ramdas Athawale | “हिंदू-मुस्लिम तरुण-तरुणी प्रेमात पडले, विवाह केला, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मला या संकल्पनेशी सहमत नाही,” असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मात्र, “धर्मांतर होऊ नये यासाठी कायद्यात तरतूद असावी,” असेही त्यांनी सांगितले.
आज (शनिवारी) शिर्डीत माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, “जातीय सलोखा बिघडवू नये, योग्य भूमिका असावी. मोदी सर्वांना समान मानतात. त्यांच्या योजनांचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो. मोदी सरकार अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे, मुस्लिम समाजाच्या नाही.”
लव्ह जिहादच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले, “दलित-सवर्ण लग्न करतात, तसेच हिंदू-मुस्लिम विवाहही होतात. त्यात चुकीचे काही नाही. मात्र, धर्मांतर सक्तीने किंवा दबावाने होता कामा नये. मुलाने हिंदू धर्म स्वीकारावा अशी तरतूदही असावी.”
आपल्या वैयक्तिक अनुभवांचा उल्लेख करत आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “मी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. जर दोन व्यक्ती परस्पर संमतीने विवाह करत असतील, तर त्याला विरोध करणे योग्य नाही.”त्यांच्या या वक्तव्यामुळे लव्ह जिहाद कायद्यावर नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश