कर्नाटकमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्याने पत्नीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैशांची मागणी करत ब्लॅकमेल केल्याचा आरोप (Crime News) करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून पत्नीनेही घरगुती हिंसाचार आणि छळाच्या आरोपांसह तक्रार दिली आहे.
श्रीकांत नावाच्या व्यक्तीने तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या पत्नी बिंदूश्रीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी दररोज 5,000 रुपये मागितले आणि तो नकार दिल्यास आत्महत्येची धमकी दिली. विवाहानंतर पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडून लाखो रुपये घेतले आणि मानसिक त्रास दिला.
एवढेच नाही तर तिच्या आईच्या बँक खात्यात 3 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले, तसेच घराच्या कर्जासाठी दरमहा 75,000 रुपयांची मागणी केली, असा आरोप श्रीकांतने केला आहे. श्रीकांतच्या म्हणण्यानुसार, तो घटस्फोट घेण्यास तयार होता, मात्र बिंदूश्रीने पोटगी म्हणून 45 लाख रुपयांची मागणी केली.
दरम्यान, बिंदूश्रीने श्रीकांत आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, तसेच बेडरूममध्ये कॅमेरा लावण्याची धमकी दिल्याचा आरोप (Crime News) केला आहे. तिने सांगितले की, सासरच्यांनी तिला एका मोलकरणीसारखे वागवले आणि “तिला गर्भवती कर म्हणजे ती सोडून जाणार नाही” असा सल्ला तिच्या दिराने श्रीकांतला दिला होता. श्रीकांतने पत्नीविरोधात तक्रार केल्यानंतर पत्नीनेही लगेचच घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
देवेंद्र फडणवीस आणि बिल गेट्स यांची मुंबईत बैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा