संधी मिळूनही अजित दादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले नाही; फडणविसांनी ठेवले मर्मावर बोट 

 Nagpur – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात विदर्भाच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान तुफान टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टिप्पणीवर फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं.

अनेक गोष्टींची चर्चा दादांनी केली, अनेक मुख्यमंत्री झाले. एका गोष्टीचे दुःख आहे की, संधी मिळूनही अजित दादा तुम्हाला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले नाही. 2004 ला संधी असतानाही तुम्हाला डावलले. पण जाऊद्या इथे तो विषय महत्वाचा नाही.” असा जोरदार टोला मारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमृता वहिनींच्या मुद्द्यावरुन अजित पवारांच्या त्या प्रश्नाला त्याचपद्धतीने त्याचजागी उत्तर दिले.

दरम्यान, अजित पवारांनी वीज तोडण्यासंबंधीच्या जीआरवरुन देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीस म्हणाले, ”दादा वीज तोडण्याचा जीआर तुम्हाला का नाही सापडला. मी ट्विट केला. फेसबूकवर पाठवला. सर्वांनाही दिला. त्यामुळे मला वाटते की, अजित दादा मला आता तुम्ही ट्विटरवर फाॅलो करा.