Weird Village Name: भारतातील ‘या’ गावांची नावेच इतकी विचित्र आहेत की सांगायलाही वाटते लाज

भारतातील अनेक राज्यांतील काही गावांची (Weird Village Name) आणि शहरांची नावे (Weird City Name) अशी आहेत की त्यांच्याबद्दल ऐकून किंवा वाचून लोक आपोआप हसतात. गावांच्या गमतीशीर नावांव्यतिरिक्त, आता आपण अशा काही नावांबद्दल जाणून घेऊया, ज्यांमुळे तेथील रहिवाशांना लाजेने मान (Weird Village Name of India) खाली घालावी लागली.

राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमध्ये गावांना अशी नावे दिली आहेत, जिथे लोकांनी त्यांच्या क्षेत्राचे नाव बदलण्यासाठी आवाज उठवला. यानंतर काही लोक गावाचे विचित्र नाव बदलून घेण्यात यशस्वी झाले आणि काही लोक अजूनही आपल्या गावाचे नाव बदलण्यासाठी धडपडत आहेत.

येथे आपण झारखंड (Jharkhand) च्या देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉकमधील बांका पंचायतीमध्ये असलेल्या एका गावाबद्दल बोलत आहोत, ज्याचे नाव असे होते की आजच्या इंटरनेट युगातील उच्च तंत्रज्ञानाच्या पिढीतील मुला-मुलींना त्यांच्या गावाचे नाव सांगण्यास लाज वाटत असे. शाळा आणि कॉलेज ते गावाचे नाव सांगू शकत नसत. वास्तविक या गावाचे नाव ‘भ…डी’ होते, त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक संस्थांसह मित्रांना गावाचे नाव सांगू शकत नव्हते.

आपल्या गावाचे नाव कसे बदलावे याची चिंता येथे राहणार्‍या लोकांना सतावत होती. आता गावाच्या नावाचीही खिल्ली उडवली जात असल्याने त्यांनी आवाज उठवला. जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला अशा प्रमाणपत्रांमध्ये देवघरच्या (Deoghar) या गावाचे नाव पाहून लोक हसू लागले. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या समस्येवर मात करण्यासाठी तरुणांनी कंबर कसली आणि पंचायतीचा आधार घेत यश संपादन केले.

बांका पंचायतीचे ग्रामपंचायत प्रधान रणजितकुमार यादव यांनी गावातील सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये नाव बदलण्यासाठी ग्रामसभेची बैठक बोलावली. ज्यामध्ये गावाचे जुने नाव बदलून ‘मसुरिया’ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यानंतर सर्व शासकीय कार्यालये व कागदपत्रांमध्ये गावाची नोंद खास मसुरियाच्या नावाने करण्यात आली. अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर यश मिळाले, त्यामुळे आता जुन्या गावाचे भो…. नाव बदलून महसूल विभागाच्या संकेतस्थळावर मसुरिया गाव म्हणून नोंद करण्यात आली आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये समान नावे
राजस्थानच्या पाली जिल्ह्यातही एक गाव आहे, जे नावासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे नाव ‘झूठा’. रायपूर उपविभागातील झुठा गाव उपविभाग मुख्यालयापासून ३ किमी अंतरावर आहे. ब्यावर पिंडवाडा फोरलेनला लागून असलेल्या या गावातील लोकांची अपेक्षा आहे की, त्यांचे गाव झुठाऐवजी सत्यपूर म्हणून ओळखले जावे.

तसेच लाठी गावातील लोकही त्यांचा पत्ता पूर्ण अभिमानाने सांगू शकत नसतील. लाठीच्या शेजारीच चाचा, सांवला, झबेरी आणि अकेली अशी विचित्र नावे असलेली गावे आहेत. मध्य प्रदेशातही अशी काही गावे आहेत, ज्यांची नावे बदलण्याची लोकांना इच्छा आहे. मध्य प्रदेशातील एका गावाचे नाव ‘घिनहा’ होते, त्यासाठी गावकऱ्यांनी नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता. येथेच सतना जिल्ह्यातील दुर्जनपूरचे नाव बदलून सज्जनपूर करण्यात आले. त्याचप्रमाणे हरियाणातील अनेक गावांची नावेही बदलण्यात आली असून काही गावांना नाव बदलण्याची प्रतीक्षा आहे.