Nana Patekar | कंगनाला महिला CISF जवानाने लगावली कानशिलात, नाना पाटेकर म्हणाले, ‘वाईट आहे पण…’

Nana Patekar | खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) दिल्लीला निघत असतानाच चंदीगढ विमानतळावर एक प्रकार घडला. एका महिला CISF सुरक्षाकर्मीने कंगनाच्या कानशि‍लात लगावली. शेतकरी आंदोलनात बोलणं कंगनाला भोवलं आणि तिला चक्क सुरक्षाकर्मीनेच थोबाडीत मारली. त्या महिलेला निलंबित करण्यात आले आहे. कंगना हिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनेकांनी विरोध केला आहे तर, अनेकांनी महिला CISF जवानाची साथ दिला आहे. आता यावर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नवी सरकार आल्यानंतर देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल का? यावर नाना पेटकर म्हणाले, ‘आमच्याकडून तर प्रत्येक गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल… गेल्या सरकारने चांगलं काम केलं आहे. येणारी सरकार देखील चांगलं काम करेल…’ असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.

कंगना हिच्याबद्दल विचारण्यात आल्यावर नाना पेटकर म्हणाले, ‘मला कंगना हिच्यासोबत काय झालं खरंच माहिती नाही. पण जे झाले ते चुकीचं आहे. असं नाही व्हायला हवं. पण ती चांगलं काम करेल अशी आशा करतो… आता सर्वकाही चांगलं होणार आहे. कारण विरोधक देखील तगडे आहे. त्यामुळे सगळे मिळून चांगलं काम करतील…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप