मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी सरकारची ताकद उभी करु : नाना पटोले

Nana Patole

मुंबई : मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोना महामारीच्या संकटामुळे चित्रपट निर्माते व रंगकर्मी यांचे मोठे नुकसान झाले झाले. परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व त्यांना सर्व ती ताकद देऊ, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मराठी चित्रपट निर्मात्यांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, चित्रपटांना उद्योगाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. उद्योगाचा दर्जा मिळाल्यास अनेक सवलतीही मिळतील. नाशिकमध्ये चित्रनगरी निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे तसेच विदर्भातही एक चित्रनगरी उभा रहावी यासाठी प्रयत्न करणार आहोत.

आज ज्या मागण्यांचे निवेदन दिले आहे त्या सर्व मागण्या तत्वतः मान्य असून चित्रपटांना अनुदानही दिले जाईल व इतर मागण्यांवरही निर्णय घेतला जाईल. चित्रपट व नाट्यगृहांना परवानगी देताना ५० टक्के प्रक्षेकांची परवानगी दिली आहे ती १०० टक्के देण्यासाठी प्रयत्न करु. एकपडदा चित्रपटगृहाबद्दल एक सर्वंकष धोरण ठरवले जात आहे तसेच मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करावेत यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

या बैठकीला प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतीक सेलच्या अध्यक्षा विद्या कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, सचिव राजाराम देशमुख, तजेला बगाडे, यशवंतसिंग, विष्णु शिंदे, देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे, विजय राणे, शिरीष राणे, रमेश साळगावकर, विकास तांबे, शारदा जगताप, फरजाना डांगे, दाऊद सैय्यद, जेसाभाई मोटवाणी आदी उपस्थित होते.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

Previous Post

शाहू कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार प्रदान..

Next Post
nana patole - sharad pawar

नाना फक्त बोलले पण राष्ट्रवादीने बडा नेता गळाला लावत थेट कॉंग्रेसचा गेमच केला…

Related Posts
विदर्भाबाबत काँग्रेस आणि उद्धव गटात तेढ? या 12 मतदारसंघांमुळे अडकले जागावाटप

विदर्भाबाबत काँग्रेस आणि उद्धव गटात तेढ? या 12 मतदारसंघांमुळे अडकले जागावाटप

Shivsena UBT | महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून विरोधी आघाडी महाविकास आघाडीमधील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही.…
Read More

भाजप उमेदवाराने अजितदादांचाही रेकॉर्ड मोडला, देशात सर्वाधिक मतांनी निवडून आला ‘हा’ आमदार

लखनौ – उत्तर प्रदेशातील भाजपच्या एका उमेदवाराने तर तब्बल 1 लाख 79 हजार मतांनी जिंकून विजयाचा एक नवा…
Read More

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करा – भुजबळ  

नागपूर – भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी यासाठी ज्येष्ठ…
Read More