सुईपासुन रॉकेट पर्यंतच्या वस्तू कॉंग्रेसने बनविल्या; मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता,मला अभिमान – नाना पटोले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कोरोना संदर्भात कॉंग्रेसवर गंभीर शब्दांत टीका केली आहे. यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी नरेंद्र मोदीच्या टीकेला उत्तर दिलं आहे. देशात कोरोना कोणी पसरविला आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

देशात कॉंग्रेस एक विचारधारा आहे. सुरूवातीपासून कॉंग्रेसने देशात सुईपासुन रॉकेट पर्यंतच्या वस्तू कॉंग्रेसने बनविल्या आहेत. देशातील आयत्या बनवलेले वस्तू विकण्याचे काम कॉंग्रेसचे कधीच केलं नाही. भारत देश स्वतंत्र होत असताना कॉंग्रेसचा मोठा वाटा आहे. असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.

कोरोना वाढवण्याचं काम महाराष्ट्रातील कॉंग्रेसने केल आहे. उत्तर प्रदेश, बिहार येथील मजूरांना यांनी रेल्वेची तिकीट फुकट वाटली. त्यांनी फक्त कोरोना पसरवण्याचं काम केले आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले की, कोरोना कोणी पसरविला,लोकांना कोणी वाचवला हे जनतेला कळले आहे. मला अभिमान की, मी एक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे.

 

कोरोनाच्या संकट काळात कॉंग्रेस केलेल्या कामाची माहिती देखील नाना पटोले यांनी दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, गवगवा न करता लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचविण्याचे काम कॉंग्रेस पक्षाने केले आहे. यासाठी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांनंतर ट्विटर #महाराष्ट्रद्रोही_bjp असा ट्रेंड देखील होता.