‘आता नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत’

'आता नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत'

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणाले,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही.

‘मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे. आता नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post
रस्ते फक्त गावालाच जोडत नसून ते माणसांच्या मनाला देखील जोडतात - गडकरी

रस्ते फक्त गावालाच जोडत नसून ते माणसांच्या मनाला देखील जोडतात – गडकरी

Next Post
आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारताची चिंता वाढली

आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारताची चिंता वाढली

Related Posts
शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष

शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष

नवी दिल्ली-  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदारांसह भाजपाच्या मदतीने राज्यात युतीचं सरकार स्थापन…
Read More
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय, बिकेसीमधील बाईकस्वाराच्या मदतीला गेले धावून

मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय, बिकेसीमधील बाईकस्वाराच्या मदतीला गेले धावून

Ekanath Shinde | सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशावेळी प्रत्येक नेता आपापली…
Read More
mns

“अंगावर आले तर शिंगावर घ्या, वकिलांची फौज उभी करतो” राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

रत्नागिरी –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले काही दिवस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात…
Read More