भाजप नेत्यांना दररोज सरकार पाडण्याची स्वप्ने पडतात; नारायण राणेंची पटोलेंनी उडवली खिल्ली 

भाजप नेत्यांना दररोज सरकार पाडण्याची स्वप्ने पडतात; नारायण राणेंची पटोलेंनी उडवली खिल्ली 

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

प्रदेशाध्यक्ष म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही.

‘मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली  आहे.  आता नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=lHUHZTmssSg&t=1s

Total
0
Shares
Previous Post
'महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार'

‘महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार’

Next Post
संप चालू ठेवला तर सरकारला खाजगीकरण करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो - चौधरी

संप चालू ठेवला तर सरकारला खाजगीकरण करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो – चौधरी

Related Posts
Heavy Rain In Mumbai | मुंबईत मुसळधार पावसामुळे हवाई उड्डाणांवर परिणाम, IMDने अलर्ट केला जारी

Heavy Rain In Mumbai | मुंबईत मुसळधार पावसामुळे हवाई उड्डाणांवर परिणाम, IMDने अलर्ट केला जारी

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरात पाऊस (Heavy Rain In Mumbai) पडत आहे. विशेषत: पुण्यात पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले…
Read More
महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार; झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार; झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

नवी दिल्ली  : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण…
Read More
rajesh tope - corona

राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळताच राजेश टोपेंनी केले ‘हे’ आवाहन

मुंबई : वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नॉव्हेल कोरोनाव्हायरसपासून आतापर्यंत SARS-COV-2 ची अनेक म्युटेशन्स झाली. यातलं सर्वांत…
Read More