‘भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

Mumbai – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात (62nd convocation ceremony of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) बोलताना त्यांना शिवाजी महाराबाबत वादग्रस्त विधान केले होते.

दरम्यान, आता काँग्रेसनेदेखील भाजपा आणि कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाने तसेच कोश्यारी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. ते कधी महात्मा जोतिबा फुले तर कधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे गडकरी यांना त्यांच्याच पक्षाने राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले होते अशी टीका नाना पटोले यांनी केली.

काय म्हणाले राज्यपाल?
‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.