Nana Patole | घाटकोपरमध्ये रोड शो करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले

Nana Patole | लोकसभा निवडणूक जनतेने हाती घेतली असून भाजपा व नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड राग आहे. महाविकास आघाडी बहुमताने जिंकेल असे चित्र दिसत आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. टिळक भवन येथे प्रत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडियाचे चेअरमन विशाल मुत्तेमवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया समन्वयक प्रगती अहिर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थोडीही माणुसकी राहिलेली नाही. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटेनत १६ जण ठार झाले व ७०-७५ लोक जखमी झाले. मृतांच्या नातेवाईंकांची व जखमींची भेट घेवून त्यांचे सांत्वन करण्याची माणुसकीही पंतप्रधान मोदी यांनी दाखवली नाही. घाटकोपरमधूनच रोड शो काढून नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप