Nana Patole | कोकणातील पदवीधरांना पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा

Nana Patole | कोकणातील पदवीधरांना पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा

Nana Patole | भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेला, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बरबाद करण्याचे पाप केले आहे. सत्तेच्या व पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेऊ अशी प्रवृत्ती राज्यात बळवली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत कोकणातील मतदारांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आयोजित करण्यात मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या राजवटीत महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे. १७ हजार पोलीस पदांसाठी १७ लाख अर्ज आले हे भिषण बेरोजगारीचे चित्र आहे पण ही पोलीस भरती तरी सुरुळीत पार पडेल काय याची शंका वाटते. कारण भाजपा सरकारमध्ये अशा भरती राबवल्या जातात व नंतर पेपरफुटी होते व परिक्षा रद्द होते. राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर गेले आहेत, महाराष्ट्राचे सर्व नियोजनच गायब झाले आहे. भाजपा सरकारने १० वर्षात १० पिढ्या बरबाद केल्या आहेत, वयोमर्यादा संपली की संधी जाते, ग्रामीण भागात तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे. महाराष्ट्राची वाताहत करण्याऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहेत. नागपूर व अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन इतिहास निर्माण केला ते काम पदवीधरांनीच केले असेच काम आता कोकण पदवीधरच्या निवडणुकीत करा असेही नाना पटोले म्हणाले.

या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, शेकापचे आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे उपनेते विजय कदम, माजी आमदार बळीराम पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, अभय छाजेड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मोठ्या संख्याने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबूली, अभिनेत्री बनणार मोदींच्या घरची सून

Next Post
Vijay Wadettiwar | पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी

Vijay Wadettiwar | पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी

Related Posts
राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

पुणे – राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे…
Read More
अत्याचारी ब्रिटीशांना जसे घरी पाठवले तसेच भाजपाच्या हुकूशाहीलाही घरी पाठवू

अत्याचारी ब्रिटीशांना जसे घरी पाठवले तसेच भाजपाच्या हुकूशाहीलाही घरी पाठवू

Congress: देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे…
Read More
किसान आंदोलनांच्या धर्तीवर लढा द्या : बाबा कांबळे

किसान आंदोलनांच्या धर्तीवर लढा द्या : बाबा कांबळे

Baba Kamble:-  शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेतल्यानंतर देशभरातील शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांनी केंद्र सरकारविरोधात चिकाटीने…
Read More