मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ – नाना पटोले

Nana Patole And Sameer Wankhede

मुंबई : कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदु मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली असून मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झाले आहे. काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार असून यावेळी ‘जेलभरो’ आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, या बैठकीत संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. देशात व राज्यात भाजपाने चालवलेल्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड संताप व चिड आहे. भाजप जाती धर्मांत फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत आहे. काँग्रेस सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.

राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा जनाधार मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चौथ्या क्रमांकावरून पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला आहे. या कामगिरीत सातत्य ठेवून पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देणे व सोनियाजी व राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्ह्या–जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पटोलेंनी केले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=qzP3Qte2iZI

Previous Post
Narendra Modi - Nana Patole

महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा करणे मुश्कील झालंय – नाना पटोले

Next Post
मोदींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, अजितदादा म्हणतात...

मोदींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, अजितदादा म्हणतात…

Related Posts
'मला वाडग्यात लघवी करायला लावली', पत्नीसोबतच्या मणिपुरी लग्न विधींबद्दल अभिनेत्याचा खुलासा

‘मला वाडग्यात लघवी करायला लावली’, पत्नीसोबतच्या मणिपुरी लग्न विधींबद्दल अभिनेत्याचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने अलीकडेच ‘जाट’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केले. त्याच वेळी, आता…
Read More
Ambani family | फक्त नीता अंबानीच नव्हे तर त्यांच्या जाऊबाईही जगतात आलिशान जीवन, 2231 कोटींच्या संपत्तीच्या आहेत मालक

Ambani family | फक्त नीता अंबानीच नव्हे तर त्यांच्या जाऊबाईही जगतात आलिशान जीवन, 2231 कोटींच्या संपत्तीच्या आहेत मालक

Ambani family | एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले होते आणि नंतर इंडस्ट्री सोडली…
Read More
Maratha Reservation Meeting | मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा, उदय सामंत यांचे आवाहन

Maratha Reservation Meeting | मराठा आरक्षण बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांना जरांगेनी जाब विचारावा, उदय सामंत यांचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत  (Maratha Reservation Meeting) राज्यातील महायुती सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र ज्यांनी आरक्षण दिलं…
Read More