Nana Patole | ‘कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घ्यायला लागलात …नाना जरा तरी लाज वाटू द्या’

Nana Patole | सरंजामी प्रवृत्ती जोपासणा-या नाना पटोलेंसंदर्भात एक बातमी आज दिवस चर्चेत राहिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले.अकोल्यातून चीड आणि संताप आणणारी दृश्यं आज दिवसभर चर्चेत राहिली. ज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) गाडीत बसलेत आणि काँग्रेसचा कार्यकर्ता चक्क त्यांचे चिखलात माखलेले पाय धुतोय.

अकोल्याच्या वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन नाना पटोलेंनी घेतलं. मात्र इथं पावसामुळं प्रचंड चिखल झाला होता. चिखलातून वाट काढत नानांनी दर्शन घेतलं.. त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतलं… पटोलेंच्या या सरंजामी वृत्तीवर त्यांच्या विरोधकांनी सडकून टीकेची झोड उठवलीय.

याच मुद्द्यावरून भाजप नेते प्रवीण अलई यांनी पटोले यांना लक्ष्य करताना म्हटले की, महाराष्ट्रात १३ खासदार निवडून येण्याचा मटका लागल्याबरोबर नाना पटोले यांच्या डोक्यात हवा गेली आहे. यातूनच पटोलेसारखी नेते मंडळी आता कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घ्यायला लागली.

एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांचे पाय धुवून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून त्यांचा गौरव करतात, तर दुसऱ्या बाजूला पटोले हे असा माज दाखवतात. नाना जरा तरी लाज वाटू द्या. कार्यकर्त्याला तसेच जनतेला तुम्ही गुलाम समजत असाल तर हा माज बरा नव्हे.सावकारी पद्धतीने वागणाऱ्या नाना पटोले यांचा जाहीर निषेध.असे म्हणत अलई यांनी टीकास्त्र सोडले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like