’10 कोटी कॅश देऊन 1700 एसटी बसेस ठरवल्याच्या बातम्या; पण ED या प्रकरणाची चौकशी करणार नाही’

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Eknath Shinde and Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत.या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी आपली ताकत दाखवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बीकेसी मैदानात शिंदे समर्थक कार्यकर्ते सकाळपासूनच दाखल होऊ लागले आहेत. बीकेसी मैदानातला मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी शिंदेंनी कोणतीही कसर ठेवलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट सुद्धा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत दिसत आहे.

दरम्यान, शिंदे गटाने राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत पोहोचावेत यासाठी बसेसची देखील व्यवस्था केली आहे असं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ते म्हणतात, शिंदे गटाने त्यांच्या मेळाव्यासाठी रू. 10 कोटी कॅश देऊन 1700 एसटी बसेस ठरवल्याच्या बातम्या येत आहेत. अर्थात आता ED या प्रकरणाची चौकशी करणार नाहीच. कारण त्यांच्यासाठी हे सगळं ‘ओक्के मंधी हाय !!’असं पटोले यांनी म्हटले आहे.