Nanded LokSabha By-Election | भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. केंद्रिय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. निवडणुक जाहीर झाल्याने आजपासून आचारसंहिता लागू होईल.
दरम्यान नांदेड लोकसभा पोट निवडणुकीचीही (Nanded LokSabha By-Election) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्युनंतर जागा रिक्त होती. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबतच मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
नियाेजनबध्द विकासकामे केल्यानेच पर्वती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास – MLA Madhuri Misal
‘आष्टी उपसा सिंचन योजने’साठी मंत्रीमंडळाची 772 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
आतातरी सलमान खानने माफी मागावी; बाबा सिद्दिकींच्या निधनानंतर भाजप नेत्याची मागणी