उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते – राणे  

मुंबई: गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावं, तुम्ही चुली पेटवणारे नाही तर चुली उद्धस्त करण्याचं काम केलंय, मराठी तरुणाच्या (Marathi youth) हातात दगड दिले अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज (Shame) वाटते असाही टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत आपल्या सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरीविषयी बोलणं अपेक्षित होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांत राज्यातील सामान्य माणसाच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना (farmers) ठाकरे सरकारने दमडीही दिली नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. घरात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (Via video conference) सरकार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील वेगवेगळया समाज घटकांच्या वेदना, व्यथा कळल्याच नाहीत. आपल्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही हे ठाऊक नाही हे माहिती असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी असभ्य, शिवराळ भाषेचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली, असं वक्तव्य राणे यांनी केलं.

केमिकल लोचा (Chemical Locha) ही मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत भाषा. मांडीला मांडी लावून नवाबभाई चालतात पण मराठीत मुन्नाभाई नाव असले तर चालत नाहीत. नवाबभाई चालतात कारण त्यांचा दाऊदशी संबंध आहे. १९९१ पासून आम्हाला जे संरक्षण आहे ही त्यांची कृपा आहे. दाऊदजा संबंध भाजपासोबत (BJP) जोडायचा. आमचा काय संबंध दाऊदशी. केंद्र सरकारने सगळ्या कारवाया केल्या आहेत,” असे नारायण राणे म्हणाले.