Sharad Pawar | बजेटबद्दल नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका 

Sharad Pawar | बजेटबद्दल नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका 

Sharad Pawar | नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील १ टक्का सुद्धा काही खरं नाही. ज्यावेळी देश चालवायचा असेल, त्यावेळी जाती-धर्माचा विचार करून देश चालवता येईल का? नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की,  नरेंद्र मोदी विचारतात, की मी काय केलं? पण १० वर्षांचा त्यांचा स्वतःचा अनुभव घेतला, तर ते ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या राज्यातील शेतीचा कोणताही प्रश्न असला तर ते माझ्याकडे यायचे, मला घेऊन गुजरातला जायचे. वेळी असं झालं, की मी इस्त्राईलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला. अमेरिकेने त्यांचा त्यावेळेस VISA नाकारला होता. त्यांनी सांगितलं, मला इस्राईलला तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे, मी त्यांना घेऊन गेलो. तिथल्या कृषी गोष्टी त्यांना ४ दिवस दाखवल्या. आज हे सगळं माहीत असताना हल्ली ते जे बोलतात, ते माझ्या मते राजकारण आहे दुसरं काही नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे. असे शरद पवार  म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, बजेटबद्दल नरेंद्र मोदी यांचे मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे. बजेट हे कोणत्या जाती धर्माचे नसते, पार्लमेंटमध्ये जे बजेट मांडले जाते, ते देशाचे असते. असे असताना ते जे सांगत आहेत, की मुस्लिमांचे वेगळे ते कधीही होत नाही व होऊ शकत नाही. असेही शरद पवार  यांनी सांगितले आहे.

सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मुंबईसारख्या शहरामध्ये ‘रोड शो’ अरेंज करणं हे शहाणपणाचे लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंडिशन भयंकर होत असते. त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतला, तो गुजराती परिसर आहे. मला कळत नाही, त्यांना जर करायचं होतं तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला परिसर आहे. पण त्यांचं लक्ष एका वर्गातच होतं. त्याचा लोकांना त्रास झाला व लोकांच्या तक्रारी आल्या. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज जी विरोधी शक्ती आहे, त्याच्यात एक नंबरची जागा त्यांची आहे. ५ वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली, त्यात त्यांच्या ५८ जागा होत्या. आमचे ५२ होते आणि काँग्रेसचे काहीतरी ४८ किंवा ४५ होते. नकली शिवसेना म्हणजे काय ? आज शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत. असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार म्हणाले की, घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी मी जाऊन आलो. माझ्या मते मुंबई महानगरपालिका, त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. पण त्या संकटाची व्याप्ती इतकी होती, की एका दिवसात त्यांना यश येईल असं नाही. जे काम करत आहेत, त्यांच्यावर टीका करण्याची स्थिती नाही. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की, जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास यांचे काही नाते आहे, जे शिवछत्रपतींसाठी ओळखला जाते. लाचारी असेल, नाही असं नाही, पण त्याची पातळी देखील त्या लोकांनी सोडली. पण एक चांगलं झालं, की त्या लोकांनी सांगितलं, की पुन्हा आम्ही याची काळजी घेऊ. असे शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
K. Laxman | काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

K. Laxman | काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

Next Post
Jayant Patil | महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या! काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही

Jayant Patil | महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या! काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही

Related Posts
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून तोडगा काढावा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून तोडगा काढावा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले…
Read More
महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? : अतुल लोंढे

महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? : अतुल लोंढे

मुंबई – भारतीय जनता पक्षाला (BJP) निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा…
Read More

‘आज जनतेने सांगतिलंय की केजरीवाल आतंकवादी नाहीये, तर…’

पंजाब : आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पंजाबमध्ये यावेळी जनतेने ‘आप’ला पसंती दिली आहे. तर काँग्रेसची सपशेल पिछेहाट झाली…
Read More