उद्धव ठाकरे खुर्चीच्या भीतीने अफझाल खान कबरीच्या भोवतीचं बेकायदेशीर बांधकाम पाडू शकले नाहीत ?

ठाणे – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझाल खान कबरीच्या भोवतीचं बांधकाम हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय बनला होता. याच अनधिकृत बांधकामावर सरकारनं हातोडा मारला आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता. त्याच शिवप्रतापदिनाचा मुहूर्त साधत कबरीभोवतीच्या बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सरकारचा हा सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike On Afzal Khan Tomb) मानला जातोय.

दरम्यान, शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जो अफजल खान आपल्या देशाच्या विरोधात महाराजांना मारण्यासाठी आला होता. पण महाराजांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला..तरी सुद्धा त्याच्या वधानंतर त्याचा सन्मान करत त्याच्या कबरीला थोडी जागा दिली.मात्र काही काळाने काही लोकांनी आपलं स्तोम माजवत तेथे उरूस सुरू झाले आणि महाल निर्माण झालं.अनेक संघटनांनी ते बेकायदेशीर काम पडावं अशी मागणी केली होती. परंतु ते पडण्याची कोणाची हिम्मत झाली नाही.

अडीच वर्षां पूर्वी हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आलं. परंतु ते स्वतःला सेक्युलर समजू लागले. आणि खुर्चीच्या भीतीने ते हे बेकायदेशीर बांधकाम पाडू शकले नाहीत.बाळासाहेबांच्या विचारांचा मुख्यमंत्री आला खऱ्या अर्थाने एक मराठा, एक मावळा, बाळासाहेबांचा खरा चेला मुख्यमंत्री झाला…आणि ते बेकायदेशीर बांधकाम पाडलं, हे पाहून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला असता.

बाळासाहेबांना, आनंद दिघे साहेबांना आनंद झाला असता की माझ्या शिष्याने हे काम केलं. हिरवं अजगर जे वाढलं होतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढून टाकलं आहे. एका मावळ्याने हिम्मत ही केलेली आहे. असे अनेक अफजलखान जरी आले ना तरी त्यांचे कोथळे बाहेर काढू.असं त्यांनी म्हटले आहे.