‘सुषमाजी…आमच्या सारखे सतरंज्या उचलणारे आहेत म्हणून पक्षाचे काहीही काम न करता आपण उपनेत्या झालात’

ठाणे – सुषमा अंधारे काल सभेत नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली होती आता या टीकेला म्हस्के यांनी उत्तर दिले आहे. संधी दिली तर सलाम आणि केवळ सत्तेचे गुलाम ही माझी संस्कृती नाही बाईंना निष्ठा म्हणजे काय हे माहिती असण्याची शक्यता नाही त्यामुळे त्यांचा तोल जातो.आमच्या सारखे सतरंज्या उचलणारे आहेत म्हणून ही शिवसेना उभी राहिली आहे अशी टीका त्यांनी अंधारे यांच्यावर केली आहे.

म्हस्के म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांना म्हातारा म्हटले,हिंदू देव देवतांच्या विरोधात बोलले, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली शिवसेनेच्या विरुद्ध टीका केली तरीही पक्षाच्या विरुद्ध टीका करून सुद्धा आमच्या सारखे सतरंज्या उचलणारे आहेत म्हणून त्याच पक्षाचे काहीही काम न करता आपण उपनेत्या झालेल्या आहेत, आपण प्रवक्त्या झालेल्या आहात.त्यामुळे पक्षमधे सतरंज्या उचलणाऱ्या ना फार मोठी किंमत आहे.

सुषमा ताई आपण पक्षात नवीन आहात आपल्याला केवळ ओरडण्या करीता मराठीत शुद्ध मराठीत भुंकण्याकरिता आपल्याला घेतलेलं आहे. आमची काळजी करू नका नरेश म्हस्के फक्त सतरंज्या उचलणारा असता तर मातोश्री ला विचार नरेश म्हस्केचे मन परिवर्तन करण्या करीता सकाळ संध्याकाळ कोण फोन करत होत किती फोन करत होते. अजूनही किती निरोप दिले जातात त्यामुळे नरेश म्हस्के विकला जाणारा नाहीये. आमच्या ठाणेकर मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहणारा आहे. काही मिळो अथवा न मिळो आम्ही बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेले आहोत. हिंदुत्वाचा भगवा झेंडा हातात घेऊन पुढे घेऊन जात आहेत असे ते म्हणाले.