Narrative setting Politics | ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’ अहवालाचे प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते विमोचन

नागपूर | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून संविधानविरोधी नॅरेटिव्ह सेटिंगचे राजकारण ( Narrative setting Politics) करण्यात आले. या दिशाभुल करणाऱ्या राजकारणाच्या प्रत्युत्तरात भारतीय जनता पार्टीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या मोहिमेचा अहवाल प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचेद्वारे ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’ नावाने (Narrative setting Politics) प्रसिद्ध करण्यात आला. या अहलावाचे विमोचन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते आज शुक्रवार १४ जून रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य मार्गदर्शना नंतर झालेल्या हया कार्यक्रम प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. आशिष शेलार , राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीद्वारे जनतेपुढे अनेक विकासाचे मुद्दे पुढे ठेवण्यात आले. यासोबतच ‘अब की बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार’ हा नारा देण्यात आला. मात्र विरोधकांकडून याबाबत अपप्रचार करीत संविधान बदलविण्यासाठी ‘४०० पार’चा नारा देण्यात येत असल्याचा मुद्दा पुढे करून जनतेची दिशाभूल करण्यात आली. विरोधकांच्या या नॅरेटिव्ह सेटिंगविरोधात राज्यात नॅरेटिव्ह तोडण्याची मोहिम राबविण्यात आली. यात प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार सुधीर पारवे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मिलींद माने, सुभाष पारधी, संदीप जाधव, शरद कांबळे , राहुल कांबळे यांनी महाराष्ट्रातील विविध लोकसभा क्षेत्रात मोहिम चालविली.

राज्यातील १५ लोकसभा मतदार संघातील ९० पेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रात प्रवास करून तिथे १३ पेक्षा अधिक पत्रकार परिषद घेतल्या व काँग्रेसच्या संविधानाबाबतच्या नॅरेटिव्ह सेटिंगचा बुरखा फाडण्यात आला. याशिवाय ४० हजार समाजजागृती पत्रक वाटून संविधानाबाबत सुरू असलेल्या अपप्रचारातील वास्तव पुढे ठेवले. आंबेडकरी चळवळीतील विविध ठिकाणच्या व्यक्तींशी भेट घेउन त्यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला. या संपूर्ण काळातील कार्य आणि यात सहभागी व्यक्तींना दिलेल्या जबाबदा-या या सर्वांचा अहवाल ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’च्या रुपात जनतेपुढे सादर करण्यात आलेला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like