मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने दिनांक ६ फेब्रुवारीपासून ‘युवा जोडो अभियान’ ( Yuva Jodo Abhiyan) सुरू करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली.
युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर तर सायंकाळी ४ वाजता जालना, शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा, सायंकाळी ४ वाजता अकोला, शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वाशिम, सायंकाळी ४ वाजता नांदेड, रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता हिंगोली, सायंकाळी ४ वाजता परभणी आदी ठिकाणी ‘युवा जोडो अभियान’ राबविणार आहेत.
‘अजितपर्व’ नावाने युवक काँग्रेसने सलग चार दिवस हे ‘युवा जोडो अभियान’ सुरू ( Yuva Jodo Abhiyan) केले असून यामध्ये युवक मेळावे आणि सदस्य नोंदणी मोहीमही राबवली जाणार आहे. त्यामुळे या आठ जिल्हयातील जास्तीत जास्त युवक या तिन्ही अभियानात जोडण्याचा मानस असल्याचे सुरज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवाजी महाराजांवर टिप्पणी करणाऱ्या राहुल सोलापूरकरांना गोळ्या झाडा, उदयनराजे संतापले
दिल्लीच्या विधानसभेचा कौल कुणाच्या बाजूने लागणार? एक्झिट पोलचे आकडे समोर आले
“कराडचा मुलगा कोट्यवधींच्या गाडीत फिरतो, पण मुंडेंच्या मुलाकडे…”, करुणा मुंडेंचे मोठे विधान