नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

नवी मुंबई – नवी मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित होते.

31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणा नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहे. बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार आहे. येत्या काळात मुंबई, मुंबई उपनगरप्रमाणेच नवी मुंबईचाही कायापालट होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार असल्याने आतंरराष्ट्रीय स्थरावर नवी मुंबईचं वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे आगामी होणारी नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आहे.