नवनीत राणा तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात दाखल; स्पॉन्डॅलिसिसचा त्रास वाढला

मुंबई – हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणामुळे तुरुंगात जावं लागलेल्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची १३व्या दिवशी सुटका झाली. नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगातून सोडण्यात आलं. जामीनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आज खासदार राणा तुरूंगातून बाहेर पडल्या. मात्र प्रकृती ठीक नसल्याने त्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेलं जाणार आहे.

तुरुंगात असताना आपल्याला स्पॉन्डॅलिसिसचा(Spondylosis)  त्रास असल्याचं वारंवार सांगूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, त्या सध्या लीलावती रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना बाहेर सोडायचं की उपचार सुरू ठेवायचे हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान,  कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यामांना कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले, केवळ हात जोडून त्यांनी नमस्कार केला. तर, त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) हे तळोजा कारागृहात(Taloja Jail)  असून त्यांच्या सुटकेची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे.