“रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यावर मी त्यांना विचारेन की आता कसं वाटतंय ?”

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा (Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, कालच्या या सभेवर सत्ताधारी आणि विरोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मातोश्रीवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa on Matoshri) म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. याला आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेत शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंगबद्दल काहीही उल्लेख केला नाही. फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती. अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. असं त्या म्हणाल्या.

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना (Rashmi Thackeray) तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. कोणताही गुन्हा न करता तुरुंगात (Jail) टाकल्याच्या दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे. ती वेळही लवकरच येणार आहे जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते,” अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.