नवनीत राणा यांनी ‘डी गँग’शी संबंधित युसूफ लकडावालांकडून कर्ज घेतलं, ED चौकशी करणार का?

मुंबई: राणा दाम्पत्य आणि शिवसेना हा वाद काही शमण्याची चिन्हं नसून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता त्याची चौकशी करणार का असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

युसुफ लकडावाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती, त्यावेळी त्याचे डी गँग अर्थात अंडरवर्ल्डशी संबंध होते. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुराव्यासह फोटो सुद्धा ट्वीट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.