माझे कितीही पुतळे जाळा …मी तुम्हाला आरसा दाखवणारच – नवाब मलिक

मुंबई : माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच… आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.

हे देखील पहा