‘मित्रांनो सांगा यामध्ये गुरु कोण आणि घंटाल कोण ?’

मुंबई : अमली पदार्थ विरोधी विभाग, अर्थात एनसीबीने मुंबईच्या समुद्रात क्रूझवरील ड्रग पार्टीवर केलेली कारवाई ही पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत यामागे भाजप असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

या कारवाईत मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी हे एनसीबीचे अधिकारी नसलेले लोक कारवाई करताना दिसत आहेत. भानुशाली हा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे. तर गोसावी हा खासजी हेर असल्याचा तो दावा करत आहे. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी या दोघांचा एक फोटो ट्विट करत ‘साथियों बताइये इसमें कौन है गुरु और कौन है गुरु घंटाल ?’ असा सवाल केला आहे.

दरम्यान, गेल्या १ वर्षांपासून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या सरकारला आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम करत आहे, बनावट छापे मारत आहे आणि ३ तारखेचा सगळा ड्रामा हा बनावट आहे आणि असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

हे दिखील पहा