मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नुकतीच एनसीबीने एका ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. राज्यात सध्या हे ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत असून राजकीय कलगीतुरा देखील पाहायला मिळत आहे. विशेषतः मंत्री हे आर्यन खानच्या बाजूने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खिंड लढवताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप वानखेडे आणि एनसीबीने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना दिसून येत आहे.
यातच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक पाकिस्तानचे एजंट असून, पाकिस्तानमधील ड्रग्ज माफियांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे सिंधुदुर्गात मीडियाशी बोलत होते. नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड अॅम्बेसेडर झाले आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे, हे त्यांना कळत नाही, या शब्दांत नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला.
शिवसेनेची सत्ता असताना समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. मराठी माणसांविषयी शिवसेनेला काहीच पडलेले नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू म्हणवून घेणे हे पाप झाले आहे. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवे, असा टोला लगावत पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हे ही पहा: