नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी!

नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी!

ठाणे : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेला आरोपाचा बार फुसका ठरला आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज ‘मायक्रोबायॉलॉजिस्ट’ असलेल्या किरण गोसावींना आज पत्रकार परिषदेत समोर आणले. अन् नवाब मलिकांसह सोशल मिडियावर भाजपाला आरोपींच्या पिंजऱ्यात बसविणारे तथाकथित समाजमाध्यमी तोंडघशी पडले.

भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे आणि किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स काल समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. मंत्री नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर स्नॅप शॉट्स व्हायरल झाले. त्यामुळे भाजपाविरोधात ब्रह्रास्त्र सापडल्याच्या आनंदात व आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे तोंडघशी पडले आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

या प्रकाराने ‘खोदा पहाड निकला चुहा‘ अशी स्थिती निर्माण झाली. मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन व खोटी माहिती देऊन कोणीही दिशाभूल करू नये, असा टोला आमदार डावखरे यांनी मारला. ‘ट्र्यू पॅथलॅब’चे संचालक असलेल्या किरण प्रकाश गोसावी यांचे नामसाधर्म्य आढळल्यानंतर टणाटणा उड्या मारून बदनामी करण्याचा डाव शिजला, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला. केवळ ४००-४५० रुपये भरून सविस्तर माहिती घेण्याऐवजी शहानिशा न करता हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले, असे डावखरे यांनी सांगितले.

मंत्री नवाब मलिक यांनी दीड महिन्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे जाहीर केले. मात्र, हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, पूर परिस्थिती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतची चर्चा टाळण्याबरोबरच विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला.

दरम्यान, गेल्या ७ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांकडून माझ्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मी माझी कागदपत्रे व पासपोर्ट दाखविला. केवळ नावात सारखेपणा असल्यामुळे मला नाहक त्रास झाला, असे ट्र्यू पॅथलॅबचे संचालक किरण गोसावी यांनी सांगितले.

पोलिस तक्रार करणार

समाजमाध्यमांमध्ये ‘स्नॅप शॉट्स’ व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
दीपावली साजरी करताना नागरिकांना करावे लागणार 'या' नियमांचे पालन, अन्यथा कारवाई अटळ

दीपावली साजरी करताना नागरिकांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन, अन्यथा कारवाई अटळ

Next Post
#ShivsenaCheatsMumbaikar ट्रेंड ट्विटर ट्रेंडिंगमध्ये!

#ShivsenaCheatsMumbaikar ट्रेंड ट्विटर ट्रेंडिंगमध्ये!

Related Posts

काँग्रेस पक्ष व तरुणांच्या रेट्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची भाजपा सरकारवर नामुष्की:- नाना पटोले

Nana Patole: सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने (Congress) सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा…
Read More
Eknath Shinde

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत येणार, या नेत्यांची भेट घेणार

नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister…
Read More

The Orient Express : पंचताराकित हॉटेल्स देखील या लक्झरी ट्रेनमधून प्रवास करताना वाटतील फिके

लंडन – बरेच लोक ट्रेनने प्रवास करण्याचा आनंद घेतात. जगात अशा अनेक आलिशान गाड्या आहेत, ज्यांच्या समोर मोठमोठी…
Read More