देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोपाचे गंभीर परिणाम नवाब मलिक यांना भोगावे लागतील- पाटील

पुणे : संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. सुधाकर भालेराव उपस्थित होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले आहे, असे पाटील यांनी निदर्शनाला आणले.

ते म्हणाले की, राज्यात महापूर आला. अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळायची आहे. त्यांना पीक विमा मिळायचा आहे. विशेष जास्त पाऊस नसतानाही पूर का आला, याची अद्याप चौकशी झालेली नाही. कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप चालू आहे आणि २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे शेकड्यांनी वाढले आहेत. अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करणे चालू आहे.

त्यांनी सांगितले की, नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. पण वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.

ते म्हणाले की, नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्त आहेत. पण तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी. पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता? रोज तोंडाची वाफ का दवडता?

( मुकुंद कुलकर्णी )
कार्यालय सचिव

https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0

Previous Post
आर्यन खान पेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे- समरजितसिंह घाटगे

आर्यन खान पेक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे- समरजितसिंह घाटगे

Next Post

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात काळी फीत लावून आंदोलन

Related Posts
'आम्ही देव आहोत की नाही, लोकांना ठरवू द्या', आरएसएसच्या मोहन भागवत यांचे वक्तव्य | Mohan Bhagwat

‘आम्ही देव आहोत की नाही, लोकांना ठरवू द्या’, आरएसएसच्या मोहन भागवत यांचे वक्तव्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी सांगितले की, महान कार्य करणाऱ्या…
Read More
Devendra Fadnavis - Uddhav Thackeray

जाणून घ्या सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली का?

मुंबई – महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील आपले सरकार…
Read More
पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई! दोन तरुण ताब्यात, तिसरा पळाला

ATS : पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई! दोन तरुण ताब्यात, तिसरा पळाला

Pune – पुणे पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान कोथरूड येथे दोघांना ताब्यात घेण्यात आलं. देशविघातक कृत्याचा संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू…
Read More